-
तस्करी आणि बनावट व्यापार विरोधात चळवळ अर्थात MASCRADE (Movement against Smuggled & Counterfeit Trade) २०२१ च्या ७ व्या आवृत्तीचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
फिक्की कॅसकेड (FICCI CASCADE - Committee Against Smuggling and Counterfeiting Activities Destroying the Economy) मार्फत विशेषत: कोविडनंतरच्या युगात अवैध व्यापार रोखण्यासाठी सदर २ दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
-
बनावट, तस्करदृश्य उत्पादनांच्या वाढत्या घटनांना आळा घालत कृतीशील आणि नाविन्यपूर्ण धोरणांवर चर्चा करण्यास एक व्यासपीठ याद्वारे प्रदान करण्यात आले.