• संयुक्त राष्ट्रांच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त पोस्ट ऑफिस विभाग (Department of Posts - DOP), दळणवळण मंत्रालयामार्फत (Ministry of Communications) एक स्मृती टपाल तिकीट जारी करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांच्या मते संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाच्या (UN Security Council) विस्ताराला भारताकडून सर्वात जास्त प्राधान्य देण्यात आले आहे.

  • पोस्ट विभागातर्फे यापूर्वी १९५४, १९८५ आणि १९९५ साली संयुक्त राष्ट्रांच्या अनुक्रमे ९ व्या, ४० व्या आणि ५० व्या वर्धापनदिनानिमित्त अशा प्रकारची स्मारक टपाल तिकीटे जारी करण्यात आली होती.

भारतीय पोस्टबाबत महत्वपूर्ण माहिती

  • महासंचालक: अरुंधती घोष या सध्या महासंचालक पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • निर्मिती वर्ष: १ ऑक्टोबर १८५४ रोजी भारतीय पोस्टची निर्मिती करण्यात आली होती.

संयुक्त राष्ट्रांबाबत (UN) महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.

  • स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.

  • सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.