• ७ सप्टेंबर २०२० रोजी जागतिक पातळीवर निळ्या आकाशासाठीचा स्वच्छ हवा दिन साजरा करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे

  • आरोग्य, उत्पादनक्षमता, अर्थव्यवस्था आणि पर्यावरण या सर्वांकरिता स्वच्छ हवा महत्वाची आहे याची व्यक्ती, समुदाय आणि सरकार या सर्व स्तरांवर जनजागृती करणे हे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे. .

  • संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमार्फत १९ डिसेंबर २०१९ रोजी आपल्या ७४ व्या अधिवेशनात निळ्या आकाशासाठीच्या आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिनाबाबतचा ठराव स्विकारण्यात आला होता.

संयुक्त राष्ट्रांबाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.

  • सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • सदस्यता प्राप्त देश: सध्या संयुक्त राष्ट्रांमध्ये १९३ सदस्य देश तर २ निरीक्षक देश आहेत.