• 'जागतिक कापूस दिन (World Cotton Day - WCD)' २०१९ सालापासून दरवर्षी ७ ऑक्टोबर रोजी जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • कापसाचे नैसर्गिक गुणधर्म, उत्पादन, परिवर्तन, व्यापार आणि खप यापासून लोकांना मिळणाऱ्या फायद्यांचे महत्व साजरे करण्याच्या उद्देशाने सदर दिवस साजरा करण्यात येतो.

  • ऑक्टोबर २०१९ मध्ये जागतिक व्यापार संघटनेमार्फत (World Trade Organization - WTO) सदर दिवसाची स्थापना करण्यात आली होती.

WTO बाबत महत्वपूर्ण माहिती 

  • अर्थ: WTO म्हणजेच World Trade Organization अर्थात जागतिक व्यापार संघटना होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे WTO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना वर्ष: १ जानेवारी १९९५ रोजी WTO ची स्थापना झाली होती.

  • महासंचालक: रॉबर्टो अझेवेडो हे सध्या WTO च्या महासंचालक पदावर कार्यरत आहेत.

  • सदस्य देश: WTO चे १६४ सदस्य देश आहेत.