• दरवर्षी ७ नोव्हेंबर रोजी 'राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन (National Cancer Awareness Day)' देशभर साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • कर्करोग आणि त्याची लक्षणे तसेच त्याच्या उपचाराबाबत जनजागृती करण्यासाठी सदर दिवस साजरा करण्यात येतो.

  • जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organization - WHO) अभ्यासानुसार कर्करोग हे जगभरात होणाऱ्या मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण आहे.

राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिनाबाबत महत्वपूर्ण माहिती

  • सदर दिवस सर्वप्रथम २०१४ मध्ये साजरा करण्यात येईल असे तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी जाहीर केले होते.

  • भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेत्या मेरी क्युरी यांची जयंतीदेखील याच दिवशी येते.

इतर महत्वपूर्ण माहिती

  • जागतिक कर्करोग दिन (World Cancer Day) दरवर्षी ४ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो.