• दरवर्षी ७ डिसेंबर रोजी 'आंतरराष्ट्रीय नागरी उड्डयन दिन (International Civil Aviation Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • जगातील सामाजिक आणि आर्थिक विकासाबाबतचे विमानचालनाचे महत्त्व ओळखण्यासाठी दरवर्षी ७ डिसेंबर रोजी सदर दिवस साजरा करण्यात येतो.

  • आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतुकीचे राज्यांमधील सामाजिक आणि आर्थिक विकासातील महत्त्व आणि जागरूकता वाढविणे हा आंतरराष्ट्रीय नागरी उड्डयन दिनाचा मुख्य उद्देश आहे.

  • 'जागतिक विमान विकासासाठी प्रगतशील नाविन्य (Advancing Innovation for Global Aviation Development)' ही सदर दिवसासाठी २०२३ सालापर्यंत थीम ठरवण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संघटनेबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यालयाचे ठिकाण: माँट्रियाल, कॅनडा हे आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संघटनेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • अध्यक्ष: साल्वाटोर सियाचिटानो हे सध्या अध्यक्ष पदावर विराजमान आहेत.

  • स्थापना वर्ष: ७ डिसेंबर १९४४ रोजी सदर संघटनेची स्थापना करण्यात आली होती.