• मृदा आरोग्य कार्ड (Soil Health Card - SHC) योजनेच्या अनावरणाच्या स्मरणार्थ तसेच योजनेच्या फायद्यांविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी मृदा आरोग्य कार्ड दिन (Soil Health Card Day) साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • २०२१ हे SHC योजनेच्या अनावरणाचे ६ वे वर्ष आहे.

  • पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्यामार्फत १९ फेब्रुवारी २०१५ रोजी राजस्थानच्या सूरतगड येथे मृदा आरोग्य कार्ड योजनेचे अनावरण करण्यात आले होते.

  • दर २ वर्षांनी शेतकऱ्यांना माती आरोग्य कार्ड देणे हे सदर योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.