-
दरवर्षी ६ नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर 'युद्ध आणि सशस्त्र संघर्षातील वातावरणाचे शोषण रोखण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय दिन (International Day for Preventing the Exploitation of the Environment in War and Armed Conflict)' म्हणून साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
संयुक्त राष्ट्र आमसभेमार्फत (UN General Assembly) ५ नोव्हेंबर २००१ रोजी ६ नोव्हेंबर हा दिवस जाहीर करण्यात आला.
UN बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.
-
स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.
-
सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.