• दरवर्षी ६ ऑगस्ट रोजी 'भारतीय आदिवासी सहकारी विपणन महासंघ (Tribal Co-operative Marketing Federation of India - TRIFED)' स्थापना दिवस साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • यंदा २०२१ साली TRIFED आपला ३४ वा स्थापना दिवस साजरा करत आहे.

  • आदिवासी उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होऊन त्यांचा विकास व्हावा या उद्देशासाठी TRIFED ची स्थापना करण्यात आली होती.

TRIFED बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: TRIFED म्हणजेच 'Tribal Co-operative Marketing Federation of India' अर्थात 'भारतीय आदिवासी सहकारी विपणन महासंघ' होय.

  • स्थापना वर्ष: ६ ऑगस्ट १९८७ रोजी TRIFED ची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे TRIFED च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • सध्याचे अध्यक्ष: रमेश चंद मीना हे सध्या TRIFED च्या अध्यक्ष पदावर विराजमान आहेत.

  • संस्थेचे उद्दिष्ट: आदिवासींचा सामाजिक-आर्थिक विकास करणे हे TRIFED चे मुख्य उद्दिष्ट आहे.