-
दरवर्षी ६ ऑगस्ट रोजी जागतिक स्तरावर 'हिरोशिमा दिन (Hiroshima Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या वेळी जपानमधील हिरोशिमावर झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्याच्या स्मरणार्थ सदर दिवस साजरा केला जातो.
-
६ ऑगस्ट १९४५ रोजी अमेरिकेने हिरोशिमा शहरावर 'लिटल बॉय (Little Boy)' नावाचा अणुबॉम्ब टाकला होता. या हल्ल्यामुळे संपूर्ण क्षेत्र बेचिराख झाले होते.
-
सदर घटनेची विध्वंसक स्थिती लक्षात घेऊन शांततेला प्रोत्साहन देणे तसेच अण्वस्त्रांच्या धोक्यांविषयी जागरूकता निर्माण करणे या उद्देशांसाठी हा दिवस साजरा केला जातो.