-
विद्यार्थ्यांचे जीवन घडविण्याच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल शिक्षकांचा योग्य सन्मान करण्यासाठी भारतात दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती तसेच शिक्षणतज्ज्ञ म्हणून विख्यात असलेले डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस भारतात साजरा केला जातो.
-
१९६२ सालापासून भारतात ५ सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा करण्यात येत आहे.
-
डॉ. राधाकृष्णन यांनी १९६२ साली भारताच्या राष्ट्रपती पदाचा कार्यभार स्वीकारला होता तेव्हापासून हा दिवस साजरा करण्यात येत आहे.
-
आपल्या जीवनात शिक्षकांनी घेतलेले कष्ट, आव्हाने आणि अतुलनीय भूमिकेची दखल घेण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो.