• गोव्यातील पणजी येथे भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (International Film Festival of India - IFFI) ५१ वी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती.

ठळक मुद्दे

  • विविध श्रेणींमधील २२४ चित्रपटांपैकी ५० चित्रपटांचे स्क्रीनिंग या महोत्सवात करण्यात आले.

  • सदर ऊत्सवात बांगलादेश हा 'लक्ष केंद्रीत करणारा देश (country of focus)' होता.

  • 'लक्ष केंद्रीत करणारा देश (country of focus)' या विभागात बांगलादेशच्या ४ चित्रपटांचा समावेश करण्यात आला होता.

IFFI पुरस्कार विजेत्यांची यादी 

  • सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सुवर्ण मयूर पुरस्कार: इनटू द डार्कनेस (Into the Darkness)

  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठीचा रौप्य मयूर पुरस्कार (पुरुष): झु-चुआन लिऊ, द सायलंट फॉरेस्ट (The Silent Forest)

  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठीचा रौप्य मयूर पुरस्कार (महिला): झोफिया स्टॅफिएज, आय नेव्हर क्राय (I Never Cry)

  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा रौप्य मयूर पुरस्कार: चेन-निएन को, द सायलंट फॉरेस्ट (The Silent Forest)

  • सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक पुरस्कार: कॅसिओ परेरा डॉस सॅंटोस, व्हॅलेंटीना (Cássio Pereira dos Santos, Valentina)

  • विशेष उल्लेख पुरस्कार: कृपाल कलिता, ब्रिज (Bridge)

  • विशेष ज्युरी पुरस्कार: कामिन कालेव, फेब्रुवारी (February)

  • ICFT UNESCO गांधी पुरस्कारः आमेन नायफेह २०० मीटर (Ameen Nayfeh’s 200 Meters)

  • इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार: विश्वजित चॅटर्जी

  • जीवनगौरव पुरस्कार: व्हिटोरिओ स्टोरॅरो (इटालियन सिनेमॅटोग्राफर)