• यूके आधारित ईस्टर्न आय (Eastern Eye) या वृत्तपत्रामार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या '५० जागतिक आशियाई सेलिब्रिटींच्या (५० Asian Celebrities In The World)' २०२० सालच्या यादीमध्ये सोनू सूद अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे.

ठळक मुद्दे

  • कोविड - १९ साथीच्या काळात सोनू सूदच्या प्रेरणादायी तसेच परोपकारी कार्याबद्दल विशेषत: स्थलांतरित कामगारांना त्यांच्या गावी पोहोचण्यास मदत करण्याच्या कार्याबाबत गौरव करण्यात आला आहे.

  • सोनू सूदने हॉलिवूड, संगीत, दूरदर्शन, साहित्य आणि सोशल मीडिया यामधील जागतिक ताऱ्यांना मागे टाकत २०२० सालाचा अव्वल आशियाई सेलिब्रिटी बनण्याचा मान मिळवला आहे.

  • कॅनेडियन यू ट्यूबर, सोशल मीडिया स्टार, कॉमेडियन लिली सिंग दुसर्‍या क्रमांकावर विराजमान झाली आहे.

यादीतील इतर भारतीय सेलिब्रिटी

  • भारतीय गायक अरमान मलिक त्याच्या उल्लेखनीय संगीतामुळे ५ व्या स्थानी आला आहे.

  • ६ व्या क्रमांकावर प्रियांका चोप्रा - जोनास जगातील सर्वात प्रसिद्ध भारतीय स्टार म्हणून कायम राहिली आहे

  • पॅन - इंडियन स्टार प्रभास ७ व्या स्थानावर विराजमान झाला आहे.