• संयुक्त राष्ट्र संघामार्फत दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर धर्मादाय दिन साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • जगभरातील लोक, स्वयंसेवी संस्था आणि भागधारकांना तसेच विविध उपक्रमांद्वारे इतरांना मदत करण्यासाठी एकत्रित आणण्याकरिता हा दिवस साजरा करण्यात येतो.

  • मानवतावादी संकटे कमी करण्यासाठी आणि राष्ट्रांमधील मानवी वेदना शमवण्यासाठी धर्मादाय संस्थेमार्फत घेतल्या गेलेल्या भूमिकेस मान्यता देण्याचे कार्य हा दिवस करतो.

संयुक्त राष्ट्रांबाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.

  • सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • सदस्यता प्राप्त देश: सध्या संयुक्त राष्ट्रांमध्ये १९३ सदस्य देश तर २ निरीक्षक देश आहेत.