• दरवर्षी 'जागतिक त्सुनामी जागृती दिन (World Tsunami Awareness Day)' ५ नोव्हेंबर रोजी जगभरात साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • त्सुनामीच्या धोक्यांबाबत जागतिक स्तरावर जनजागृती करण्याच्या उद्देशाने सदर दिवस साजरा करण्यात येतो.

  • आपत्तींविरूद्ध लढून जास्तीत जास्त लोकांचा जीव वाचवण्यासाठी राष्ट्रीय व समुदाय पातळीवरील आपत्ती जोखीम कमी करण्याच्या धोरणास हा दिवस प्रोत्साहित करतो.

  • डिसेंबर २०१५ मध्ये संयुक्त राष्ट्र आमसभेमार्फत (UN General Assembly) ५ नोव्हेंबरला 'जागतिक सुनामी जागृती दिन' म्हणून मान्यता देण्यात आली होती.

  • 'जागतिक त्सुनामी जागृती दिन' ही संकल्पना जपानच्या विचारमंथनातून उदयास आली होती.

UN बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.

  • स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.

  • सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.