• दरवर्षी ५ मे रोजी 'जागतिक हात स्वच्छता दिन (World Hand Hygiene Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • जागतिक आरोग्य संघटनेमार्फत (World Health Organization - WHO) अनेक गंभीर संक्रमणांपासून बचावासाठी हाताच्या स्वच्छतेच्या महत्वाबाबत जागरूकता जागरुकता निर्माण करण्यासाठी सदर दिवस आयोजित केला जातो.

  • ‘काही सेकंद जीवन वाचवतात: आपले हात स्वच्छ ठेवा (Seconds Save Lives: Clean Your Hands)’ ही सदर दिवसाची यंदाच्या २०२१ सालाची थीम आहे.

WHO बाबत महत्वपूर्ण माहिती 

  • अर्थ: WHO म्हणजेच World Health Organization अर्थात जागतिक आरोग्य संघटना होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: जिनिव्हा, स्वित्झर्लंड हे WHO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना वर्ष: ७ एप्रिल १९४८ रोजी WHO ची स्थापना करण्यात आली होती.

  • महासंचालक: टेड्रोस अडॅनॉम सध्या महासंचालक पदावर कार्यरत आहेत.