-
'जागतिक पर्यावरण दिन (World Environment Day)' दरवर्षी ५ जून रोजी जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
पर्यावरणाचे रक्षण करण्याविषयी जनजागृती करण्यासाठी तसेच निसर्गाला कमी लेखू नये याची आठवण करून देण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो.
-
'पुन्हा कल्पना करा. पुनर्निर्मिती करा. पुनर्संचयित करा (Reimagine. Recreate. Restore)' ही यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम आहे.
-
यावर्षी पर्यावरणातील जीर्णोद्धाराचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी पाकिस्तान आजच्या दिवसाचा जागतिक आयोजक आहे.
-
पहिला जागतिक पर्यावरण दिन १९७४ मध्ये 'एकच पृथ्वी (Only one Earth)' या घोषणेसह साजरा करण्यात आला होता.