• दरवर्षी ५ डिसेंबर रोजी 'जागतिक मृदा दिन (World Soil Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • मानव कल्याण, अन्न सुरक्षा आणि परिसंस्थेसाठी मातीच्या गुणवत्तेचे महत्त्व पटवून देण्यासाठी सदर दिवस साजरा करण्यात येतो.

  • अन्न व कृषी संघटनेचे (Food and Agriculture Organization - FAO) 'माती जिवंत ठेवा, मृदा जैवविविधतेचे रक्षण करा (Keep soil alive, protect soil biodiversity)' हे अभियान आरोग्यदायी पर्यावरण संस्था आणि मानव कल्याण टिकवून ठेवण्याच्या महत्वाबाबत जागरूकता आणण्यासाठी मुख्यतः कार्यरत आहे.

  • सदर उपक्रमाचे मुख्य समर्थक असणाऱ्या थायलंडचे दिवंगत राजे भूमीबोल अदुल्यदेव यांच्या ५ डिसेंबर या अधिकृत वाढदिवसानुसार ही तारीख निवडली गेली आहे.

जागतिक मृदा दिनाचा इतिहास

  • २००२ मध्ये आंतरराष्ट्रीय मृदा विज्ञान संस्थेमार्फत (International Union of Soil Sciences - IUSS) सदर दिवस साजरा करण्यासाठी या दिवसाची शिफारस करण्यात आली होती.

  • डिसेंबर २०१३ मध्ये संयुक्त राष्ट्र आमसभेमार्फत ५ डिसेंबर २०१४ ला पहिला अधिकृत जागतिक मृदा दिन म्हणून नामित करून प्रतिसाद देण्यात आला होता.

FAO बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: FAO म्हणजेच Food and Agriculture Organization अर्थात अन्न व कृषी संघटना होय.

  • स्थापना वर्ष: १९४५ साली संस्थेची स्थान करण्यात आली होती.

  • संस्थेचे प्रमुख: क्यू डोंग्यू हे सध्या संस्थेच्या प्रमुख पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: रोम, इटली हे संस्थेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

IUSS बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: IUSS म्हणजेच International Union of Soil Sciences अर्थात आंतरराष्ट्रीय मृदा विज्ञान संस्था होय.

  • सध्याचे अध्यक्ष: तकाशी कोसाकी हे सध्या IUSS च्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.

  • स्थापना वर्ष: १९२४ साली IUSS ची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: व्हिएन्ना, ऑस्ट्रिया हे IUSS च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.