-
दरवर्षी ५ डिसेंबर रोजी 'आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन (International Volunteer Day - IVD)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
सदर दिवसाला 'आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन' म्हणून देखील संबोधण्यात येते.
-
'एकत्रितपणे आपण स्वयंसेवेद्वारे करू शकतो (Together We Can Through Volunteering)' ही आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन २०२० ची थीम आहे.
-
संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमार्फत १९८५ मध्ये सदर दिवस साजरा करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले होते.
-
स्वयंसेवक आणि संघटनांचे प्रयत्न साजरे करणे, स्वयंसेवा कार्याला प्रोत्साहन देणे, सरकारांना प्रोत्साहित करणे आणि शाश्वत विकास लक्ष्ये (Sustainable Development Goals - SDGs) साध्य करण्यासाठी स्वयंसेवकांच्या योगदानास मान्यता देणे या उद्देशांच्या पूर्तीसाठी सदर दिवस साजरा करण्यात येतो.