-
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एचआयएस मार्किट (HIS Markit) आयोजित चौथ्या 'भारतीय ऊर्जा फोरम (India Energy Forum)' आवृत्तीचे उद्घाटन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
'परिवर्तनाच्या जगात भारताचे ऊर्जा भविष्य (India’s Energy Future in a World of Change)' ही सदर २०२० सालच्या आवृत्तीची थीम आहे.
-
पंतप्रधान मोदी यांच्या मते शाश्वत वाढीच्या दृष्टीने जागतिक वचनबद्धतेचे पालन करत ऊर्जा न्यायाची खात्री करणे हे भारताच्या ऊर्जा योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
-
लघु कार्बन पदचिन्हे असणाऱ्या भारतीयांचे जीवन सुधारण्यासाठी अधिक ऊर्जा सध्या आवश्यक आहे.
-
भारताच्या ऊर्जा क्षेत्राबाबत उद्योग-अनुकूल, विकासकेंद्री तसेच पर्यावरणासंदर्भात जागरूक अशी त्यांच्यामार्फत कल्पना करण्यात आली आहे.