• भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank of India - RBI) पतधोरण समितीमार्फत (Monetary Policy Committee - MPC) २०२०-२१ सालासाठीचे तिसरे द्वि-मासिक चलनविषयक धोरण जाहीर करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • RBI गव्हर्नर श्री. शक्तीकांत दास यांच्यामार्फत तिसर्‍या द्वि-मासिक चलनविषयक धोरणामध्ये महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय जाहीर करण्यात आले आहेत.

  • तरलता समायोजन सुविधेअंतर्गत (Liquidity Adjustment Facility - LAF) रेपो दर (Repo Rate) ४% इतका कायम ठेवण्यात आला आहे.

  • रिव्हर्स रेपो दर (Reverse Repo Rate) ३.३५% इतका कायम ठेवण्यात आला आहे.

  • सीमांत स्थायी सुविधा (Marginal Standing Facility - MSF) दर आणि बँक दर (Bank Rate) ४.२५% इतका कायम ठेवण्यात आला आहे.

RBI बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: RBI म्हणजेच Reserve Bank of India अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया होय.

  • सध्याचे गव्हर्नर: शक्तीकांत दास हे सध्या RBI चे २५ वे गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई येथे RBI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना: १ एप्रिल १९३५ रोजी कोलकाता येथे RBI ची स्थापना झाली होती.