• संयुक्त राष्ट्र आमसभेमार्फत ३१ ऑक्टोबरला 'जागतिक शहरे दिवस (World Cities Day)' म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • सदर दिवस हा जागतिक शहरीकरणामध्ये आंतरराष्ट्रीय समुदायाला प्रोत्साहित करणे तसेच जगभरातील शाश्वत नागरी विकासासाठी हातभार लावणे या उद्देशांसाठी साजरा करण्यात येतो.

  • चीमधील शांघाय येथे ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी सुरू झाल्यापासूनचा २०२० सालाचा 'जागतिक शहरे दिवस' हा ७ वा जागतिक उत्सव म्हणून साजरा होत आहे.

संयुक्त राष्ट्रांबाबत (UN) महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.

  • स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.

  • सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.