• दरवर्षी ३१ मे रोजी जागतिक आरोग्य संघटना (World Health Organization - WHO) आणि जागतिक भागीदारांमार्फत 'जागतिक तंबाखू विरोधी दिन (World No Tobacco Day - WNTD)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • तंबाखू वापराच्या हानिकारक आणि प्राणघातक परिणामांविषयी जागरूकता वाढविण्याची तसेच कोणत्याही प्रकारे तंबाखूच्या वापरास निरुत्साहित करण्याची संधी हा दिवस उपलब्ध करून देतो.

WHO बाबत महत्वपूर्ण माहिती 

  • अर्थ: WHO म्हणजेच World Health Organization अर्थात जागतिक आरोग्य संघटना होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: जिनिव्हा, स्वित्झर्लंड हे WHO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना वर्ष: ७ एप्रिल १९४८ रोजी WHO ची स्थापना करण्यात आली होती.

  • महासंचालक: टेड्रोस अडॅनॉम सध्या महासंचालक पदावर कार्यरत आहेत.