संयुक्त राष्ट्रांमार्फत (United Nations - UN) दरवर्षी ३१ ऑगस्ट रोजी 'आफ्रिकन वंशाच्या लोकांसाठी आंतरराष्ट्रीय दिवस (International Day for People of African Descent)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- जगभरातील आफ्रिकन वंशाच्या लोकांचे महत्त्वपूर्ण योगदान अधोरेखित करण्यासाठी तसेच सर्व प्रकारच्या भेदभावाविरुद्ध लढा देण्याच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांमार्फत दरवर्षी ३१ ऑगस्ट रोजी हा दिवस साजरा करण्यात येतो.
- यंदाची २०२६ सालची या दिवसाची ६ वी आवृत्ती साजरी केली जात आहे.
- २०२६ ची थीम/संकल्पना: 'आफ्रिकन वंशाच्या लोकांच्या मानवाधिकारांचा विस्तार करणे (Expanding the Human Rights of People of African Descent)' ही २०२६ सालची या दिवसाची संकल्पना आहे.
दिवसाची पार्श्वभूमी:
- संयुक्त राष्ट्र आमसभेमार्फत १६ डिसेंबर २०२० रोजी ठराव मंजूर करत दरवर्षी ३१ ऑगस्ट हा दिवस 'आफ्रिकन वंशाच्या लोकांसाठी आंतरराष्ट्रीय दिवस' म्हणून साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले.
- मध्य अमेरिकेतील कोस्टा रिका या देशाने हा दिवस सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला होता.
- ३१ ऑगस्ट २०२१ रोजी पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला होता.