• 'आंतरराष्ट्रीय जॅझ दिन (International Jazz Day)' दरवर्षी ३० एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • जॅझ या प्रकाराचे महत्त्व पटवून देण्यासाठी तसेच जगातील लोकांना एकत्रित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

  • यंदा २०२१ साली आंतरराष्ट्रीय जॅझ दिनाचा १० वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे.

  • जाझ पियानो वादक आणि युनेस्को सद्भावना राजदूत हर्बी हॅनकॉक यांच्या कल्पनेवर सदर दिवस तयार करण्यात आला होता.

UNESCO बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UNESCO म्हणजेच United Nations Educational, Scientific and Cultural Organization अर्थात संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: पॅरिस, फ्रान्स हे UNESCO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • संस्थेचे प्रमुख: ऑड्रे अझोले हे सध्या UNESCO च्या प्रमुख पदावर विराजमान आहेत.

  • स्थापना वर्ष: १९४५ साली UNESCO ची स्थापना करण्यात आली होती.