दरवर्षी ३० ऑगस्ट रोजी संपूर्ण भारतात 'राष्ट्रीय लघु उद्योग दिन' (National Small Industry Day - NSID) साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे:

  • सर्वसमावेशक विकासामध्ये लघु उद्योग आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे योगदान अधोरेखित करणे तसेच आर्थिक विकास, रोजगार निर्मिती यांवर भर देण्यासाठी दरवर्षी ३० ऑगस्ट रोजी संपूर्ण भारतात हा दिवस साजरा केला जातो.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • ३० ऑगस्ट २००० रोजी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी लघु उद्योगांवरील पहिल्या राष्ट्रीय परिषदेत लघु उद्योगांसाठी एका सर्वसमावेशक धोरण पॅकेजची घोषणा केली होती.
  •  भारत सरकारमार्फत ३० ऑगस्ट हा दिवस या धोरणाच्या घोषणेचे स्मरण म्हणून 'राष्ट्रीय लघु उद्योग दिन' म्हणून साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले होते.
  • ३० ऑगस्ट २००१ रोजी पहिला 'राष्ट्रीय लघु उद्योग दिन' साजरा करण्यात आला होता.