संयुक्त राष्ट्रांमार्फत (United Nations - UN) जगभरात दरवर्षी ३० ऑगस्ट रोजी 'सक्तीने बेपत्ता केलेल्या व्यक्तींच्या बळींचा आंतरराष्ट्रीय दिवस (International Day of the Victims of Enforced Disappearances)' पाळण्यात येतो. 

ठळक मुद्दे:

  • ज्या व्यक्तींना सक्तीने बेपत्ता करण्यात आले आहे त्यांचा सन्मान करणे तसेच न्याय, सत्य व उत्तरदायित्वाचा पुरस्कार करणे या मुख्य उद्देशाने हा दिवस साजरा करण्यात येतो.
  • २०२६ हे वर्ष सक्तीने बेपत्ता करण्याबाबतच्या संयुक्त राष्ट्रांच्या कराराचा २० वा वर्धापन दिन आहे.
  • थीम/संकल्पना: 'प्रथम बळी (Victims first). आताच कृती (Actions now)' ही यंदाच्या या दिवसाची संकल्पना आहे.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • २१ डिसेंबर २०१० रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमार्फत ठराव मंजूर करत ३० ऑगस्ट हा दिवस 'सक्तीने बेपत्ता केलेल्या व्यक्तींच्या बळींचा आंतरराष्ट्रीय दिवस' म्हणून पाळण्याची घोषणा करण्यात आली.
  • ३० ऑगस्ट २०११ रोजी हा दिवस पहिल्यांदा पाळण्यात आला होता.