• 'जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन (World Press Freedom Day)' दरवर्षी ३ मे रोजी जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • आपला जीव गमावलेल्या पत्रकारांना सदर दिवसाद्वारे श्रद्धांजली वाहिली जाते.

  • जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून लोकांसमोर बातम्या आणण्यासाठी त्यांना कठीण परिस्थितींचा सामना करावा लागतो.

  • 'माहिती म्हणजे सार्वजनिकदृष्ट्या एक चांगली बाब (Information as a Public Good)' ही यंदाच्या २०२१ सालच्या जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिनाची थीम आहे.

  • संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमार्फत १९९३ मध्ये जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिनाची स्थापना करण्यात आली होती.

UN बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.

  • स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.

  • सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.