• दरवर्षी ३ मार्च रोजी 'जागतिक वन्यजीव दिन (World Wildlife Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • पृथ्वीवरील वन्यजीव आणि वनस्पतींचे सुंदर आणि वैविध्यपूर्ण प्रकार साजरे करण्यासाठी सदर दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जातो.

  • सदर दिवस वन्यजीव गुन्हेगारीविरूद्ध लढा देण्याचे तसेच मानव-प्रेरित प्रजाती घटीबाबतच्या गोष्टीचे स्मरण करून देतो.

  • 'वन आणि जीवनमान: शाश्वत लोक आणि ग्रह (Forests and Livelihoods: Sustaining People and Planet)' या थीम अंतर्गत २०२१ सालचा जागतिक वन्यजीव दिन साजरा करण्यात येत आहे.

जागतिक वन्यजीव निधीबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यालयाचे ठिकाण: ग्लॅन्ड, स्वित्झर्लंड हे जागतिक वन्यजीव निधीच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना वर्ष: २९ एप्रिल १९६१ रोजी मॉर्गेस, स्वित्झर्लंड.येथे सदर संस्थेची स्थापना करण्यात आली होती.

  • अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: कार्टर रॉबर्ट्स हे या पदावर कार्यरत आहेत.