• जागतिक आरोग्य संघटनेमार्फत (World Health Organisation - WHO) दरवर्षी ३ मार्च रोजी 'जागतिक श्राव्य दिन (World Hearing Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • बहिरेपणा तसेच श्रवण नुकसान कसे टाळता येईल याविषयी जागरूकता वाढविणे तसेच जगभरातील कान आणि श्रवण काळजीला प्रोत्साहन देणे या मुख्य उद्देशांसाठी जागतिक श्राव्य दिन दरवर्षी ३ मार्च रोजी आयोजित करण्यात येतो.

  • 'सर्वांची श्राव्य काळजी !: स्क्रीन, पुनर्वसन, संप्रेषण (Hearing care for ALL!: Screen, Rehabilitate, Communicate) ही जागतिक श्राव्य दिन २०२१ ची थीम आहे.

WHO बाबत महत्वपूर्ण माहिती 

  • अर्थ: WHO म्हणजेच World Health Organization अर्थात जागतिक आरोग्य संघटना होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: जिनिव्हा, स्वित्झर्लंड हे WHO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना वर्ष: ७ एप्रिल १९४८ रोजी WHO ची स्थापना करण्यात आली होती.

  • महासंचालक: टेड्रोस अडॅनॉम सध्या महासंचालक पदावर कार्यरत आहेत.