-
संयुक्त राष्ट्रसंघामार्फत दरवर्षी ३ जून रोजी 'जागतिक सायकल दिन (World Bicycle Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
शाश्वत विकासाला चालना देण्याचे महत्वपूर्ण साधन म्हणून सायकलचा उपयोग करण्यास पुढाकार घेण्यासाठी केला जातो.
-
मुले आणि तरुणांचे शिक्षण मजबूत करणे, आरोग्यास चालना देणे, सहिष्णुता वाढविणे तसेच परस्पर समन्वय आणि सन्मान देणे हे सदर दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
-
एप्रिल २०१८ मध्ये संयुक्त राष्ट्र आमसभेतर्फे हा दिवस जाहीर करण्यात आला होता.
-
समाजातील सर्व सदस्यांमध्ये सायकलबाबत जागृती करणे हे देखील त्याचे ध्येय आहे.