• संयुक्त राष्ट्र संघामार्फत (United Nations - UN) दरवर्षी जुलैच्या पहिल्या शनिवारी 'आंतरराष्ट्रीय सहकारी दिन (International Day of Cooperatives)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • सहकारी संस्थांबाबत जागरूकता वाढविण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो.

  • 'एकत्रितपणे चांगले पुनर्निर्माण (Rebuild better together)' ही यंदाच्या २०२१ सालच्या 'आंतरराष्ट्रीय सहकार दिनाची' थीम आहे.

UN बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.

  • स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.

  • सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.