• 'आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिन (International Day of Persons with Disabilities)' दरवर्षी ३ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • १९९२ मध्ये संयुक्त राष्ट्र आमसभेमार्फत सदर दिवसाची घोषणा करण्यात आली होती.

  • ‘सर्व विकलांगता दृश्यमान नाहीत (Not all Disabilities are Visible)’ ही २०२० सालाची या दिवसाची थीम आहे.

  • समाज आणि विकासाच्या सर्व क्षेत्रांमध्ये दिव्यांग व्यक्तींच्या हक्क आणि कल्याण यांना प्रोत्साहन देणे तसेच सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनातील प्रत्येक बाबतीत दिव्यांग व्यक्तींच्या परिस्थितीविषयी जागरूकता वाढवणे या उद्देशांसाठी सदर दिवस साजरा केला जातो.