-
भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू यांच्यामार्फत २०१९ साठीचे राष्ट्रीय जल पुरस्कार (National Water Awards - NWA) प्रदान करण्यात आले आहेत.
ठळक मुद्दे
-
सदर पुरस्काराची ही दुसरी आवृत्ती आहे.
-
राज्यांमध्ये तमिळनाडूने सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार प्राप्त केला आहे.
-
तमिळनाडूनंतर क्रमवारीत महाराष्ट्र व राजस्थान यांचा क्रमांक लागतो.
राष्ट्रीय जल पुरस्कारांबाबत महत्वपूर्ण माहिती
-
जलशक्ती मंत्रालय, जलसंपदा विभाग, नदी विकास विभाग आणि गंगा कायाकल्प यांच्यामार्फत हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
-
जलसंवर्धन आणि व्यवस्थापन क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धती अवलंबण्यासाठी तसेच लोकांना पाण्याच्या महत्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हे राष्ट्रीय जल पुरस्कार (National Water Awards - NWA) प्रदान करण्यात येतात.
जलशक्ती मंत्रालयाबाबत महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: २०१९ साली जलशक्ती मंत्रालयाची स्थापना झाली होती.
-
केंद्रीय मंत्री: गजेंद्रसिंग शेखावत सध्या केंद्रीय मंत्री पदावर कार्यरत आहेत.
-
राज्यमंत्री: रतनलाल कटारिया हे सध्या राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत.