-
भारतात दरवर्षी २९ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. २९ ऑगस्ट २०१२ रोजी देशात पहिला राष्ट्रीय क्रीडा दिवस भारतीय हॉकी संघातील महान खेळाडू असणाऱ्या मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात आला होता.
ठळक मुद्दे
-
२९ ऑगस्ट दिवसाची निवड ही या महान हॉकीपटूचा सन्मान करण्याच्या दृष्टीकोनातून करण्यात आली होती.
-
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार यासारख्या पुरस्कारांनी क्रीडा जगतातील नायकांचा या दिवशी सन्मान करण्यात येतो.
राष्ट्रीय क्रीडा दिनाबाबत महत्वपूर्ण माहिती
-
राष्ट्रीय क्रीडा दिन भारताच्या काही भागात राष्ट्रीय खेल दिवस नावानेदेखील ओळखला जातो.
-
१९७९ साली भारतीय टपाल विभागामार्फत मेजर ध्यानचंद यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली म्हणून दिल्लीच्या राष्ट्रीय स्टेडियमचे नाव बदलून मेजर ध्यानचंद स्टेडियम, दिल्ली असे ठेवण्यात आले होते.
-
देशात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात यावा या उद्देशाने तसेच क्रीडा प्रकाराच्या भावनेविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि विविध खेळांच्या संदेशाचा प्रसार व्हावा यासाठी मेजर ध्यानचंद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली.
-
२९ ऑगस्टला भारताचा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून घोषित करण्यात आले.
मेजर ध्यानचंद यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
मेजर ध्यानचंद यांचा जन्म अलाहाबाद येथे २९ ऑगस्ट १९०५ रोजी झाला होता.
-
ते त्यांच्या काळातील एक महान हॉकी खेळाडू म्हणून प्रसिद्धीस पावले होते.
-
१९२८, १९३२ आणि १९३६ दरम्यान त्यांनी ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकांची हॅटट्रिक मिळविली होती.
-
१९२६ ते १९४९ सालापर्यंत ते २३ वर्षे आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळले होते.
-
आपल्या सबंध कारकीर्दीत त्यांनी एकूण १८५ सामन्यांत ५७० गोल केले होते.
-
१९५६ मध्ये ध्यानचंद यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.