• दरवर्षी २९ सप्टेंबर या दिवशी 'जागतिक हृदयदिन (World Heart Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • हृदयरोग आणि त्यासंबंधीच्या आरोग्य समस्या श्रेणीकडे लक्ष वेधण्यासाठी प्रत्येक वर्षी सदर दिवस साजरा केला जातो.

  • सदर दिवस हृदयविकार आणि त्याच्याशी निगडित विविध बाबींबद्दल जागरूकता निर्माण करून प्रतिबंध व नियंत्रण याबाबतच्या उपायांवर प्रकाश टाकतो.

  • २०२० सालच्या या दिवसाची थीम 'हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाला पराभूत करण्यासाठी हृदयाचा वापर करा (Use Heart To Beat Cardiovascular Disease)' अशी आहे.

जागतिक हृदय संघटनेबाबत (World Heart Federation) महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: २००० साली जागतिक हृदय संघटनेची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: जिनिव्हा, स्वित्झर्लंड हे संघटनेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • अध्यक्ष: राजीव गुप्ता हे सध्या जागतिक हृदय संघटनेचे अध्यक्ष आहेत.