• दरवर्षी २९ सप्टेंबर रोजी 'अन्नाची नासाडी आणि कचऱ्याबाबतच्या जागृतीचा आंतरराष्ट्रीय दिवस (International Day of Awareness of Food Loss and Waste)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • अन्नाची नासाडी सोडवण्याच्या जागतिक प्रयत्नांना प्रोत्साहन देणे तसेच त्यांची अंमलबजावणी करणे या मुख्य उद्देशांसाठी २०२० सालापासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.

  • २०१९ मध्ये संयुक्त राष्ट्र आम सभेमार्फत २९ सप्टेंबर हा दिवस 'अन्नाची नासाडी आणि कचऱ्याबाबतच्या जागृतीचा आंतरराष्ट्रीय दिवस' म्हणून साजरा करण्याचे घोषित करण्यात आले.

  • 'अन्नाची नासाडी आणि नुकसान थांबवा. लोकांसाठी. ग्रहासाठी. (Stop food loss and waste. For the people. For the planet.)' ही यंदाच्या २०२१ सालच्या या दिवसाची थीम आहे.