• संयुक्त राष्ट्र संघामार्फत दरवर्षी २९ जून रोजी 'आंतरराष्ट्रीय उष्ण कटीबंध दिन (International Day of the Tropics)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • सदर दिवस उष्ण कटिबंधातील वैविध्य साजरे करण्याचे कार्य करतो.

  • उष्ण कटीबंधीय देशांसमोर उभी ठाकलेली आव्हाने तसेच संधी यांवर प्रकाश टाकणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.

UN बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.

  • स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.

  • सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.