• भारतात दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी 'राष्ट्रीय क्रीडा दिन (National Sports Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • 'हॉकीचे जादूगार' म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त २९ ऑगस्ट २०१२ रोजी पहिला 'राष्ट्रीय क्रीडा दिन' साजरा करण्यात आला होता.

  • विविध क्रीडा योजना सुरू करण्यासाठी व्यासपीठ निर्माण करणे तसेच जीवनात खेळांच्या महत्वाबद्दल जागरूकता निर्माण करणे या मुख्य उद्देशांसाठी सदर दिवस साजरा केला जातो.

  • पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच 'राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे (Rajiv Gandhi Khel Ratna Award)' नामकरण 'मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार (Major Dhyan Chand Khel Ratna Award)' असे केले आहे.