-
अणू चाचण्यांविरूद्धचा आंतरराष्ट्रीय दिन म्हणून २९ ऑगस्ट हा दिवस २०१० सालापासून जागतिक स्तरावर साजरा करण्यात येत आहे.
ठळक मुद्दे
-
अण्वस्त्र चाचणी स्फोट किंवा इतर कोणत्याही आण्विक स्फोटांच्या परिणामांविषयी जागरूकता वाढविणे आणि अण्वस्त्रमुक्त जग निर्माण करण्यासाठी एक साधन म्हणून त्याचा वापर करण्याची विघातक पद्धती बंद करण्याची गरज पटवून देणे हे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
-
२ डिसेंबर २००९ रोजीच्या संयुक्त राष्ट्र आमसभेच्या ६४ व्या सत्रादरम्यान एक ठराव एकमताने स्विकारून २९ ऑगस्ट हा दिवस अण्वस्त्र चाचण्यांविरूद्धचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून जाहीर करण्यात आला.