-
दरवर्षी २८ सप्टेंबर रोजी 'माहितीच्या सार्वत्रिक प्रवेशासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस (International Day for Universal Access to Information)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
माहितीचा सार्वत्रिक प्रवेश म्हणजेच प्रत्येकाला निरोगी व सर्वसमावेशक ज्ञान समाजासाठी माहिती घेण्याचा, प्राप्त करण्याचा तसेच प्रदान करण्याचा अधिकार आहे.
-
सदर दिवस माहिती कायद्यांमध्ये प्रवेश वाढवण्याचे तसेच त्यांच्या अंमलबजावणीचे महत्त्व अधोरेखित करण्याचे कार्य करतो.
UNESCO बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: UNESCO म्हणजेच United Nations Educational, Scientific and Cultural Organization अर्थात संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: पॅरिस, फ्रान्स हे UNESCO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
संस्थेचे प्रमुख: ऑड्रे अझोले हे सध्या UNESCO च्या प्रमुख पदावर विराजमान आहेत.
-
स्थापना वर्ष: १९४५ साली UNESCO ची स्थापना करण्यात आली होती.