-
'आंतरराष्ट्रीय अॅनिमेशन दिन (International Animation Day)' दरवर्षी २८ ऑक्टोबर रोजी जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
सदर दिवसाच्या निमित्ताने अॅनिमेशनची कला साजरी करण्यात आली आहे.
-
कलेमागील सक्रीय कलाकार, वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ यांचीदेखील ओळख अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
-
२०२० सालाचा हा १९ वा आंतरराष्ट्रीय अॅनिमेशन दिन साजरा होत आहे.
आंतरराष्ट्रीय अॅनिमेशन दिनाबाबत महत्वपूर्ण माहिती
-
युनेस्कोचा सदस्य असणाऱ्या आंतरराष्ट्रीय अॅनिमेटेड फिल्म संघटनेने (International Animated Film Association - ASIFA) २००२ मध्ये सदर दिवसाची निर्मिती केली होती.
ASIFA बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: ASIFA म्हणजेच International Animated Film Association अर्थात आंतरराष्ट्रीय अॅनिमेटेड फिल्म संघटना होय.
-
संस्थापक: जॉन हेलस हे ASIFA चे संस्थापक आहेत.
-
स्थापना वर्ष: १९६० साली अॅनेसी, फ्रान्स येथे ASIFA ची स्थापना करण्यात आली होती.