-
'कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्यासाठीचा दिवस (World Day for Safety and Health at Work)' दरवर्षी २८ एप्रिल रोजी जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
सदर दिवस हा जागतिक पातळीवरील व्यावसायिक अपघात आणि रोगाच्या प्रतिबंधास प्रोत्साहित करण्यासाठी आणि कामाच्या ठिकाणी आरोग्य आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी साजरा केला जातो.
-
'अपेक्षा करा, संकटाला प्रतिसाद द्या - आता लवचिक व्यावसायिक सुरक्षा तसेच आरोग्य प्रणालीमध्ये गुंतवणूक करा (Anticipate, prepare and respond to crises – Invest Now in Resilient Occupational Safety and Health Systems)' ही या दिवसाची २०२१ सालाची थीम आहे.
ILO बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: ILO म्हणजेच International Labour Organization अर्थात आंतरराष्ट्रीय कामगार संघटना होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे ILO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: ११ एप्रिल १९१९ रोजी ILO ची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्य महासंचालक: गाय रायडर हे सध्या मुख्य महासंचालक पदावर कार्यरत आहेत.
-
संस्थेचा प्रकार: संयुक्त राष्ट्रांची विशेष एजन्सी या स्वरूपात ILO सध्या कार्यरत आहे.
-
सदस्यत्व: ILO चे सध्या १८७ सदस्य देश आहेत.