-
दरवर्षी २७ ऑक्टोबर रोजी 'जागतिक दृकश्राव्य वारसा दिन (World Day for Audiovisual Heritage)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
रेकॉर्ड केलेल्या ध्वनी आणि दृकश्राव्य दस्तऐवजांचे महत्त्व आणि जतन करण्याच्या जोखमीविषयी जागरूकता वाढविण्याच्या उद्देशाने युनेस्कोमार्फत या दिवसाची निवड करण्यात आली होती.
-
'जगाकडे तुमची खिडकी (Your Window to the World)' ही २०२० सालच्या जागतिक दृकश्राव्य वारसा दिनाची थीम आहे.
UNESCO बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: UNESCO म्हणजेच United Nations Educational, Scientific and Cultural Organization अर्थात संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: पॅरिस, फ्रान्स हे UNESCO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
संस्थेचे प्रमुख: ऑड्रे अझोले हे सध्या UNESCO च्या प्रमुख पदावर विराजमान आहेत.
-
स्थापना वर्ष: १९४५ साली UNESCO ची स्थापना करण्यात आली होती.