• 'सतर्कता जागृती सप्ताह (Vigilance Awareness Week)' हा २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२० या कालावधीत साजरा करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे

  • ३१ ऑक्टोबर हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस येणाऱ्या आठवड्यात केंद्रीय दक्षता आयोगामार्फत दरवर्षी हा सतर्कता जागृती सप्ताह पाळला जातो.

  • 'सतर्क भारत, समृद्ध भारत [Vigilant India, Prosperous India (Satark Bharat, Samriddh Bharat)]' ही सतर्कता जागृती सप्ताहाची २०२० सालची थीम आहे.

केंद्रीय सतर्कता / दक्षता आयोगाबाबत (Central Vigilance Commission - CVC) महत्वपूर्ण माहिती

  • आयुक्त: संजय कोठारी हे सध्या आयुक्त पदावर कार्यरत आहेत.

  • निर्मिती वर्ष: फेब्रुवारी १९६४ मध्ये आयोगाची निर्मिती करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे केंद्रीय सतर्कता आयोगाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.