-
'अर्थ अवर (Earth Hour) २०२१' हा २७ मार्च, २०२१ रोजी साजरा करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
हवामान बदलाविरूद्ध लढा देण्यासाठी तसेच चांगल्या ग्रहाबद्दलच्या वचनबद्धतेस समर्थन दर्शविण्यासाठी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी पृथ्वीवरील 'अर्थ अवर' साजरा केला जातो.
-
'पृथ्वी बचावासाठी हवामान बदल (Climate Change to Save Earth)' ही अर्थ अवर २०२१ ची थीम आहे.
-
सदर दिवस म्हणजे WWF द्वारा आयोजित जागतिक स्तरावरील एक चळवळ आहे
WWF बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: WWF म्हणजेच World Wide Fund for Nature अर्थात निसर्गासाठी जगातिक निधी होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: ग्लॅन्ड, स्वित्झर्लंड हे WWF च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: २९ एप्रिल १९६१ रोजी मॉर्गेस, स्वित्झर्लंड येथे WWF ची स्थापना करण्यात आली होती.
-
अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: कार्टर रॉबर्ट्स हे सध्या संस्थेच्या या पदावर कार्यरत आहेत.