दरवर्षी २७ ऑगस्ट रोजी 'जागतिक सरोवर दिन (World Lake Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- सरोवरांचे संवर्धन, गोड्या पाण्याची सुरक्षा, जैवविविधता तसेच शाश्वत व्यवस्थापन यांकडे लक्ष वेधणे मुख्य उद्देशासाठी २७ ऑगस्ट रोजी 'जागतिक सरोवर दिन' साजरा केला जातो.
- केवळ सुंदर नैसर्गिक दृश्ये म्हणून सरोवरे ही महत्वाची नसून त्यापलीकडेही त्यांचे मोठे महत्त्व आहे.
- जागतिक सरोवर दिनाच्या माध्यमातून सरोवराशी संबंधित समस्यांबाबत अधिक जागरूकता निर्माण होऊन सरोवरांच्या परिसंस्थेचे संवर्धन, पुनरुज्जीवन आणि व्यवस्थापन यासाठी पाठिंबा वाढण्यास मदत होऊ शकते.
दिवसाची पार्श्वभूमी:
- संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने मांडलेल्या ठरावाद्वारे १२ डिसेंबर २०२४ रोजी सर्वसंमतीने हा दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली होती.
- संयुक्त राष्ट्रांद्वारे २०२५ मध्ये पहिल्यांदा जागतिक स्तरावर हा दिवस साजरा करण्यात आला होता.
- यंदाची २०२६ ची ही या दिवसाची दुसरी आवृत्ती आहे.
- २७ ऑगस्ट ही तारीख जपानमधील शिगा प्रांतात १९८४ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या 'जागतिक सरोवर परिषदेच्या (World Lake Conference)' स्मरणार्थ निवडण्यात आली होती.