-
संयुक्त राष्ट्रांमार्फत दरवर्षी २६ सप्टेंबर हा दिवस 'अण्वस्त्रांच्या समूळ उच्चाटनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस (International Day for the Total Elimination of Nuclear Weapons)' म्हणून साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
सदर दिवस जागतिक अण्वस्त्रीकरण करण्याच्या वचनबद्धतेची पुष्टी करण्याच्या उद्देशाने साजरा करण्यात येतो.
-
अण्वस्त्रांचे समूळ उच्चाटन करण्याच्या वास्तविक फायद्यांविषयी आणि ते अबाधित ठेवण्याच्या सामाजिक भानाविषयी जाणीव निर्माण करण्याची संधी सदर दिवस प्रदान करतो.
-
संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमार्फत (United Nations General Assembly) डिसेंबर २०१३ मध्ये हा दिवस जाहीर करण्यात आला होता.
संयुक्त राष्ट्रांबाबत (UN) महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.
-
स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.
-
सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.