• दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी 'राष्ट्रीय दुग्ध दिन (National Milk Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • भारतातील श्वेत क्रांतीचे जनक डॉ. वर्गीस कुरियन ज्यांना 'मिल्कमन ऑफ इंडिया (Milkman of India)' देखील म्हटले जाते, त्यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस 'राष्ट्रीय दुग्ध दिन' म्हणून साजरा केला जातो.

  • २०१४ पासून भारतात २६ नोव्हेंबर हा दिवस 'राष्ट्रीय दुग्ध दिन' म्हणून साजरा करण्यात येतो.

  • राष्ट्रीय डेअरी विकास मंडळ (National Dairy Development Board - NDDB), भारतीय डेअरी संघटना (Indian Dairy Association - IDA) तसेच राज्य दूध महासंघांसह देशातील सर्व दुग्ध कंपन्यांमार्फत सदर दिवस निश्चित करण्यात आला होता.

  • मानवी जीवनात दुधाचे अनन्यसाधारण महत्त्व पटवून देणे हे सदर दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

  • पहिला राष्ट्रीय दुग्ध दिन २६ नोव्हेंबर २०१४ रोजी साजरा करण्यात आला होता.

इतर महत्वपूर्ण माहिती

  • संयुक्त राष्ट्रांच्या वतीने दरवर्षी १ जून रोजी 'जागतिक दूध दिन (World Milk Day)' साजरा करण्यात येतो.