-
'जागतिक फार्मसिस्ट दिन (World Pharmacist Day)' दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
लोकांचे आरोग्य सुधारण्याबाबत असणाऱ्या फार्मसिस्टच्या भूमिकेविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
-
सदर दिवस हा आंतरराष्ट्रीय औषधनिर्माण महासंघ (International Pharmaceutical Federation - FIP) आणि या संस्थेच्या परिषदेचा एकत्रित स्वरूपाचा पुढाकार आहे.
-
'जागतिक आरोग्याचे रूपांतरण (Transforming Global Health)' ही सदर दिवसाची २०२० सालाची थीम आहे.
-
सदर दिवस प्रथमतः २००९ सालामध्ये नेमण्यात आला होता.
आंतरराष्ट्रीय औषधनिर्माण महासंघाबाबत (FIP) महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: FIP म्हणजेच International Pharmaceutical Federation अर्थात आंतरराष्ट्रीय औषधनिर्माण महासंघ होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: हेग, नेदरलँड्स हे FIP च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: २५ सप्टेंबर १९१२ रोजी आंतरराष्ट्रीय औषधनिर्माण महासंघाची स्थापना झाली होती.
-
अध्यक्ष: डोमिनिक जॉर्डन हे सध्या FIP च्या अध्यक्ष पदावर आहेत .